27 July 09:30

कांद्याच्या दरात जवळपास दुपटीने वाढ


कांद्याच्या दरात जवळपास दुपटीने वाढ

कृषिकिंग, नवी दिल्ली: सणासुदीचा काळ जवळ आल्यामुळे, घरगुती तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात साठेबाजांकडून कांद्याची मागणी वाढल्यामुळे आणि देशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याच्या किमती मागील आठ महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहचल्या आहे.

राष्ट्रीय फळबाग संधोधन आणि विकास महामंडळाकडून (एनएचआरडीएफ) प्रसारित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रातील लासलगाव बाजार समितीत ८.७० रुपये प्रति किलो विकला जाणारा कांदा, ३१ मे २०१७ रोजी ४.५० रुपये प्रति किलो विकला जात होता. म्हणजेच कांद्याच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. दरातील एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली वाढ ही ३० नोव्हेंबर २०१६ नंतर पाहायला मिळाली नाही. जूनच्या सुरुवातीला २९१७ टनांची विक्रमी आवक झाल्यानंतर, लासलगाव बाजार समितीतील आवक २५ जुलैला कमी होऊन १४०० टनांपर्यंत खाली आली आहे.

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल शाह यांनी सांगितले आहे की, “मध्यप्रदेशातील मागील वर्षीच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, आसाम, यासंख्या पूर्वोत्तर राज्यांकडून आणि बिहार, उत्तरप्रदेश यांसाख्या उत्तर-पूर्वी राज्यांकडून कांद्याची मोठी मागणी वाढली आहे. ज्याचा प्रभाव महाराष्ट्रातील कांदा पुरवठ्यावर होऊन दरात वाढ झाली आहे.”

तर सामान्यपणे, पावसामुळे उत्पादित मालाचा पुरवठा कमी होत असल्यामुळे, आणि दसरा-दिवाळी यांसारख्या सणांच्या विचार करून साठेबाजांकडूनही मागणीत वाढ होत असल्यामुळे कृषी उत्पादनांच्या किमती दरवर्षी याच काळात वाढत असतात.टॅग्स