18 February 16:28

कांद्याच्या ढिगाऱ्यात गाडून घेत शेतकऱ्याचे आमरण उपोषण


कांद्याच्या ढिगाऱ्यात गाडून घेत शेतकऱ्याचे आमरण उपोषण

कृषिकिंग, नाशिक: गेल्या चार महिन्यांपासून कांद्याच्या दरात सुरु असलेली घसरण थांबायचे नाव घेत नाहीये. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने स्वतःला कांद्याच्या ढिगाऱ्यात गाडून घेतल्याची घटना समोर आली आहे.

स्वतःला कांद्याच्या ढिगात गळ्यापर्यंत गाडून घेत या शेतकऱ्याने आमरण उपोषण सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पिंपळखुटे येथील शेतकरी मारुती मुंढे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

कांद्याला हमीभाव द्यावा, शेतकऱ्याचे २०१८ पर्यंत संपूर्ण कर्जमाफी दयावी, वीजबिल माफी करण्यात यावी, अशा विविध मागण्यासाठी या शेतकऱ्याने हे आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्याने केला आहे.टॅग्स