27 December 08:30

कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता


कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याच्या किमान निर्यात मूल्य हे८५० डॉलर प्रति टनांवरून ते १०५० डॉलर प्रति केले जाण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याचा वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी कांद्यावर प्रति टन ८५० डॉलर इतके निर्यात मूल्य (एमईपी) लागू करण्याच्या निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. त्यावेळी निर्धारित करण्यात आलेले प्रतिटन ८५० डॉलर हे निर्यात मूल्य येत्या ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत लागू होते. ज्यात आता वाढ करून ते १०५० डॉलर प्रति केले जाण्याची शक्यता आहे.