29 August 12:49

कांद्याच्या किमान निर्यात मूल्यवाढीचा निर्णय लवकरच


कांद्याच्या किमान निर्यात मूल्यवाढीचा निर्णय लवकरच

कृषिकिंग, नवी दिल्ली: कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात (एमईपी) वाढ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून याच आठवड्यात याबाबत अधिसूचना जारी केली जाऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून वाणिज्य मंत्रालयाला यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर कांद्याचे किमान निर्यात मूल्य आता ४५० डॉलर (२८,८०० रुपये) प्रति टन होण्याची शक्यता आहे.

देशात सध्यस्थितीत कांद्याचे उत्पादन ४० लाख मेट्रिक टन आहे. याव्यतिरिक्त ४ लाख मेट्रिक टन कांद्याचा अतिरिक्त साठाही उपलब्ध आहे.टॅग्स