13 October 10:32

कांद्याचे लिलाव दिवाळीत सुरु ठेवण्याची जिल्ह्याधिकाऱ्यांची सूचना


कांद्याचे लिलाव दिवाळीत सुरु ठेवण्याची जिल्ह्याधिकाऱ्यांची सूचना

कृषिकिंग, नाशिक: कांद्याचे भाव घाऊक बाजारात २५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढल्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कांदा व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेतली आहे. दिवाळीमध्ये आठ दिवस खरेदी बंद न ठेवता ती फक्त सणाच्या दिवशीच बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच कांद्याच्या स्टॉकची माहिती प्रशासनाला असावी, यासाठी सेल्फ डिक्लरेशन दररोज देण्याच्या सूचनाही त्यांना सर्व व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.

कांद्याचे भाव वाढल्यानंतर प्राप्तिकर विभागाने काही दिवसांपूर्वीच कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले. त्यातून कांदयाचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर महिनाभरातच पुन्हा कांद्याचे भाव वाढल्याने थेट केंद्रानेच आता दबाव वाढवला आहे. जिल्हाधिकारी यांनी बोलावलेली तातडीची बैठक ही केंद्राच्या दबावामुळे घेण्यात आल्याची चर्चा, नंतर व्यापाऱ्यामध्ये रंगली होती.

या बैठकीत व्यापाऱ्यांनी सणाच्या दिवसांत लेबर उपलब्ध नसल्याची अडचण मांडली. तसेच व्यापाऱ्यांनी दिवाळी सणात जेथे कामगार उपलब्ध होतील, तेथे सोमवार व मंगळवारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.टॅग्स