23 February 17:23

कांद्याचे दर महिन्याभरात ३० टक्क्यांनी घसरले...


कांद्याचे दर महिन्याभरात ३० टक्क्यांनी घसरले...

कृषिकिंग, नाशिक/पुणे: कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा दर सरासरी १३५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. आज सकाळी बाजार समिती सुरु होताच कांद्याला किमान १००० रुपये, कमाल १५५२ रुपये प्रति क्विंटल तर सरासरी १३५० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. दरम्यान, या महिन्यात कांद्याच्या दरात जवळपास ३० टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे.

कांदा उत्पादक प्रदेशातून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कांद्याच्या दरात झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीशिवाय नाशिक जिल्ह्यातील उमराणा बाजार समितीत कांद्याला किमान ७५० रुपये, कमाल १६८७ रुपये, तर सरासरी १५५१ रुपये इतका दर मिळाला. पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत कांद्याला किमान १२०० रुपये, कमाल १६२६ रुपये तर सरासरी १४५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही कांद्याच्या दरात सरासरी १२०० पर्यंत घसरण दिसून आली. तर इकडे पुण्यातही किमान ७०० रुपये, कमाल १६०० रुपये तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण पाहायला मिळत आहे.टॅग्स