25 August 07:15

कांद्याची साठेबाजी रोखण्यासह, दर नियंत्रणासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करावे- पासवान


कांद्याची साठेबाजी रोखण्यासह, दर नियंत्रणासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करावे- पासवान

कृषिकिंग, नवी दिल्ली: “कांद्याची साठेबाजी थांबवण्यासाठी आणि भविष्यात कांद्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ नये, यासाठी कांदा व्यापाऱ्यांना निर्धारित साठवणूक मर्यादा राज्य सरकारांनी ठरवून द्यावी.” अशा आशयाचे ट्वीट करत केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारांना सल्ला दिला आहे.

तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “कांद्याची स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी किमान निर्यात मूल्य (एमईपी) लागू करत, कांदा निर्यातीवर निर्बंध घालण्याचाही सरकार विचार करत आहे.”

तर सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये सध्या कांदा किरकोळ बाजारात ३८ रुपये प्रति किलो, मुंबईत ३४ रुपये प्रति किलो, कोलकाता येथे ४० रुपये प्रति किलो, चेन्नईत २९ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.



टॅग्स