01 November 10:49

कांदा-टोमॅटोचे दर लवकरच कमी होतील- पासवान


कांदा-टोमॅटोचे दर लवकरच कमी होतील- पासवान

कृषिकिंग, नवी दिल्ली: “केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी कांदा आणि टोमॅटोचे दरवाढी संदर्भात साठेबाजीला जबाबदार ठरवताना सांगितले आहे की, ही दरवाढ मर्यादित काळापुरती असून, येत्या काळात नवीन पीक बाजारात येताच पुरवठ्यात सुधारणा होऊन दरात घसरण होईल.” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले आहे की, “व्यापारी सध्या खूप चालाक झाले आहेत. ते शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात. मात्र तो शेतकऱ्यांकडेच ठेवतात. त्यामुळे त्यांच्यावर छापेमारी केली तरीही त्यांच्याकडे काही मिळत नाही. शेतकऱ्यांवर छापेमारी केली जाऊ शकत नाही. त्यातून मोठा हंगामा होण्याची शक्यता आहे.”

दिल्लीतील बाजारात काल टोमॅटोचे ८० रुपये प्रति किलो होता, असे असले तरी ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हा दर ५३ रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला. एका महिन्यापूर्वी टोमॅटोचे ४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. याचप्रमाणे कांदा एक महिन्यापूर्वी ३० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. जो सध्या ५१ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.टॅग्स