27 March 15:51

कांदा-टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या- अजित पवार


कांदा-टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या- अजित पवार

कृषिकिंग, मुंबई: “राज्यातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍याला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने योग्य ते धोरण आखावे. आयात-निर्यातीबाबत आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारची मदत घ्यावी,” अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

पवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला. कांद्याला आज चारशे ते पाचशे रूपये क्विंटल भाव मिळतो आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रती २० किलोला ५० रूपये भाव मिळतो आहे. राज्य सरकारने हस्तक्षेप करून कांदा-टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्यावा. आयात-निर्यातीबाबत धोरणाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करावी. कांदा–टोमॅटो उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने अत्यंत अडचणीस सापडला असून त्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकारने लक्ष घालावे, असेही पवार यावेळी म्हणाले आहे.टॅग्स