02 February 14:50

कांदा, बटाटा, टोमॅटो या फळबाग पिकांचे उत्पादन ३.७ टक्क्यांनी वाढणार- कृषी मंत्रालय


कांदा, बटाटा, टोमॅटो या फळबाग पिकांचे उत्पादन ३.७ टक्क्यांनी वाढणार- कृषी मंत्रालय

कृषिकिंग, नवी दिल्ली: सध्या कांदा, बटाटा, टोमॅटो आणि लसूणच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन मिळणेही अवघड झाले आहे. मात्र, असे असले तरी देशातील फळबाग पिकांच्या लागवडीत आणि उत्पादन मोठी होत असल्याचे समोर येत आहे. कृषी मंत्रालयाच्या २०१८-१९ च्या पहिल्या प्रारंभिक अंदाजानुसार, फळबाग पिकांच्या उत्पादनात ३.७ टक्क्यांनी वाढ होऊन, ते ३१.४६ कोटी टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, पीक वर्ष २०१८-१९ मध्ये २.५८ हेक्टरवर फळबाग पिकांची लागवड करण्यात आली आहे. जी मागील व अर्शी याच कालावधीत २०१७-१८ मध्ये २.५४ कोटी हेक्टरवर नोंदवली गेली होती. अर्थात लागवड वाढल्याने फळबाग पिकांच्या उत्पन्न ३१.४६ कोटी टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत ३१.१७ कोटी टन इतके नोंदवले गेले होते.

कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, "चालू हंगामात कांद्याचे उत्पादन १.५ टक्क्यांनी वाढून ते २.३६ कोटी टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत २.३२ कोटी टन इतके नोंदवले गेले होते. बटाटयाच्या उत्पादनात चालू हंगामात ६ टक्क्यांनी वाढ होऊन ते ५.२८ कोटी टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत ५.१३ कोटी टन इतके नोंदवले गेले होते. याशिवाय टोमॅटोच्या उत्पादनात चालू हंगामात २ टक्क्यांनी वाढ होऊन, ते २.०५ कोटी टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत १.९७ कोटी टन इतके नोंदवले गेले होते."टॅग्स