19 October 07:00

कांदा सल्ला: रांगडा कांदा रोपांची पुनर्लागण


कांदा सल्ला: रांगडा कांदा रोपांची पुनर्लागण

रांगडा कांदा रोपांच्या पुनर्लागणीच्या वेळी 40 किलो नत्र द्यावे. मात्र स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यांत पुनर्लागणीनंतर 30 आणि 45 दिवसांनी द्याव्या. कांद्याकरिता ठिबक, सिंचन पद्धतीचा वापर केला असल्यास, रोपांच्या पुनर्लागणीच्या वेळी 40 किलो नत्र देऊन उर्वरित नत्र सहा समान हप्त्यांत विभागून ठिबक सिंचनाद्वारे 60 दिवसांपर्यंत दर 10 दिवसांनी द्यावे. अॅझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू (पीएसबी) या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी 5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात अजैविक खतांसोबत देण्याची शिफारस केली आहे.
पुनर्लागणीपूर्वी किंवा पुनर्लागणीच्या वेळी ऑक्सिफ्लोरफेन (23.5 टक्के ईसी) 1.5 ते 2 मि.ली. प्रति लिटर किंवा पेंडीमिथेलिन (30 टक्के ईसी) 3.5 ते 4 मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात या तणनाशकांचा वापर करावा.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह