30 October 07:00

कांदा सल्ला: रब्बी कांद्याकरिता रोपवाटिकेची तयारी


कांदा सल्ला: रब्बी कांद्याकरिता रोपवाटिकेची तयारी

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ कीटक, कोष व तणांच्या बियांना सूर्यप्रकाशात उघडे पाडून नष्ट करण्याकरिता खोल नांगरट करावी. वाफे तयार करण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे, काडी-कचरा, तण आणि दगड काढून टाकावेत. अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत ०.०५-०.०७ हेक्टर क्षेत्रामध्ये टाकावे.

गादीवाफे १०-१५ सें.मी. उंच, १ मी रुंद आणि सोयीनुसार लांब अशा प्रकारचे तयार करावे. रोपवाटिकेतील तणांचा नाश करण्याकरिता उगवणीपूर्व तणनाशक पेंडीमिथेलिन ०.२ टक्के दराने फवारावे.

मातीतून पसरणाऱ्या रोगांना आळा घालण्याकरिता पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिमची १-२ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. मर रोगापासून निरोगी रोपे विकसित करण्याकरिता ट्रायकोडर्मा व्हिरीडीचा १२५० ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात वापर करावा. पेरणी करण्यापूर्वी नत्र, स्फुरद, पालाश ४:१:१ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात देण्याची शिफारस केली आहे. मेटालेक्सिल ०.२ टक्के दराने पानांवर फवारून मर रोग आटोक्यात आणता येतो ही फवारणी रोपवाटिकेत पेरणीनंतर १५-२० दिवसांनी करावी. खुरपणी केल्यानंतर २ किलो प्रति ५००-७०० वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह