08 December 07:00

कांदा सल्ला: रब्बी कांदा रोपांची पुनर्लागण


कांदा सल्ला: रब्बी कांदा रोपांची पुनर्लागण

स्त्रोत: कृषिकिंग डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८
१) पुनर्लागणीकरिता रोपे निवडताना योग्य काळजी घेतली पाहिजे. खूप जास्त वाढ झालेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग पुनर्लागणीपूर्वी कापून टाकावा.
२) बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागण करावी.
३) दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेऊन ४५-५० दिवसांच्या रोपांची पुनर्लागण करावी.
४) मिथोमिल ०.८ ग्रॅम प्रति लिटर अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागणीच्या २० दिवसांनंतर फवारण्याची शिफारस आहे. यामुळे फुलकिडे व पानांवरील रोग यांचा प्रतिबंध होईल.
५) पहिल्या फवारणीच्या १५ दिवसांनी प्रोफेनोफॉस १ मि.ली. प्रति लिटर अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी करण्याची शिफारस आहे.
६) पुनर्लागणीनंतर ३० दिवसांनी ३५ किलो नत्र प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे.
७) पुनर्लागणीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.