20 February 07:00

कांदा सल्ला: बिजोत्पादनाच्या कांद्याची अशी काळजी घ्या.


कांदा सल्ला: बिजोत्पादनाच्या कांद्याची अशी काळजी घ्या.

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८
कांदा बीजोत्पादनाच्या रोपांकरिता
१. बुरशीनाशक किंवा किटकनाशक यांच्या फवारण्या लागवडीच्या ८० दिवसांनंतर करू नये कारण त्यानंतर फुले उमलण्यास सुरुवात होते.
२. फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा किटकनाशक फवारल्यास मधमाशांना हानी पोहोचते.
३. अत्यंत आवश्यक असेल तरच हाताने खुरपणी करावी. फुलदांड्यांना हानी पोहचणार नाही याची काळजी खुरपणी करताना घ्यावी.
४. पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/adverties_product.phpटॅग्स