09 October 07:00

कांदा सल्ला: फुलकिडे व पानांवरील रोग नियंत्रण उपाय


कांदा सल्ला: फुलकिडे व पानांवरील रोग नियंत्रण उपाय

कांदा पिकावर मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर अधिक मिथोमिल 0.8 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागणीच्या 15 दिवसांनी फवारणी करण्याची शिफारस आहे. यामुळे फुलकिडे व पानांवरील रोग यांचा प्रतिबंध होईल. पहिल्या फवारणीच्या 10-15 दिवसानंतर कार्बोसल्फान 2 मि.ली. प्रति लिटर अधिक ट्रायसायक्लोझोल 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी करण्याची शिफारस आहे. दुसर्या फवारणीच्या 10-15 दिवसानंतर प्रोफेनोफॉस 1 मिली प्रति लिटर अधिक हेक्साकोनाझोल 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी करण्याची शिफारस आहे.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे