30 July 07:00

कांदा सल्ला: पुनर्लागण पद्धती


कांदा सल्ला: पुनर्लागण पद्धती

कांदा पिकात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागण करावी. रोपांची चांगली वाढ व्हावी याकरिता पुनर्लागणीच्या वेळी आणि पुनर्लागणीनंतर तीन दिवसांनी पाणी देण्याची गरज असते.सतत पाऊस पडत असल्यास काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता अतिरिक्त पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणे आवश्यक आहे.
डॉ.शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचानलाय, राजगुरूनगर



टॅग्स