17 August 07:00

कांदा सल्ला: पर्णीय रोग व किडींचे नियंत्रण करा


कांदा सल्ला: पर्णीय रोग व किडींचे नियंत्रण करा

खरीप कांद्याच्या उभ्या पिकाला नत्र खताचा पहिला हप्ता 25 कि./हे. या प्रमाणात पुनर्लागणीनंतर 30 दिवसांनी द्या. नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास 10 ग्रॅम/ली. या प्रमाणात युरियाचा पर्णीय छिडकाव करून नत्राच्या कमतरतेवर मात करता येते. काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यास रोगाच्या नियंत्रणाकरिता बेनॉमिल (0.2 टक्के) ची पहिली रोगप्रतिंबंधक फवारणी करावी.बेनॉमिलच्या फवारणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब (2.5 ग्रॅम/ली.) सोबत मेथोमिल (0.8 ग्रॅम/ली.) ची दुसरी फवारणी करण्याची शिफारस केली आहे. यामुळे पर्णीय रोग व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव आटोक्यात राहील.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणेटॅग्स