07 August 07:00

कांदा सल्ला: खरीप कांदा रोपे पुनर्लागण


कांदा सल्ला:  खरीप कांदा रोपे  पुनर्लागण

कांद्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला असल्यास, रोपांच्या पुनर्लगणीच्या वेळी 40 किलो नत्र देऊन उर्वरित नत्र सहा हप्त्यांत ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येकी 10 दिवसांच्या अंतराने 60 दिवसांपर्यंत द्यावे. अॅझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू (पीएसबी) या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी 5 कि./ हे. या प्रमाणात अजैविक खतांसोबत देण्याची शिफारस केली आहे.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणेटॅग्स