09 March 10:26

कांदा विक्री अनुदान योजनेस २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ


कांदा विक्री अनुदान योजनेस २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ

कृषिकिंग, मुंबई: राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा आहे. राज्य शासनाने २०० रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदानासाठी २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या काळात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटलला दोनशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोनशे क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त ४० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

राज्य सरकारने कांदा अनुदानाची घोषणा करताना १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या कालावधीतील कांदा विक्रीसाठी अनुदान घोषित केले होते. मात्र, कांदा दरातील घसरण जैसे थे असल्याने प्रथमतः कांदा अनुदानासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा एकदा ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुतदवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुन्हा एकदा वाढ करून ती २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.टॅग्स