06 November 07:00

कांदा लसून सल्ला: लसूण लागवडीकरिता पूर्व मशागत


कांदा लसून सल्ला: लसूण लागवडीकरिता पूर्व मशागत

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ शेताची नांगरणी करून व मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे तयार करण्यापूर्वी हेक्टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन कोंबडी खत किंवा ७.५ टन गांडूळ खत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.
रासायनिक खतांमधून हेक्टरी नत्र ७५ किलो, स्फुरद ४० किलो, पालाश ४० किलो व गंधक ४० किलो देणे आवश्यक आहे. लसूण लागवडीच्या वेळी २५ किलो नत्र द्यावे. मात्र स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्या. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यांत लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात. लसणाकरिता ठिबक सिचन पद्धतीचा वापर केला असल्यास, लागवडीपूर्वी २५ किलो नत्र देऊन उर्वरित नत्र सहा समान हप्त्यांत विभागून ठिबक सिंचनाद्वारे ६० दिवसांपर्यंत दर १० दिवसांनी द्यावे.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे