07 December 17:25

कांदा प्रश्न रौद्ररूप धारण करतोय...पुन्हा शेतकऱ्याने ट्रॅक्टर रस्त्यावर ओतला


कांदा प्रश्न रौद्ररूप धारण करतोय...पुन्हा शेतकऱ्याने ट्रॅक्टर रस्त्यावर ओतला

कृषिकिंग, येवला(नाशिक): कांदा प्रश्न दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करतोय. दररोज कुठे ना कुठे आंदोलन होत असतानाच आता त्याचं लोण येवला तालुक्यातही येऊन पोहचलंय. शेतकरी विजय खिल्लारे यांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र, त्यांचा कांदा मातीमोल भावाने खरेदी करण्यात आल्याने येवला-मनमाड महामार्गावर ट्रॅक्टर ओतून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शेतकरी खिल्लारे यांनी आपला ६ ते ७ क्विंटल कांदा येवला बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. त्यांच्या या कांद्याला आज येवला बाजार समितीत १८२ रुपये प्रति क्विंटल इतका अल्प दर मिळाला. या कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांनी बाजार समिती बाहेर महामार्गावर ट्रॅक्टर ओतून सरकारचा निषेध केला आहे.टॅग्स