28 July 16:50

कांदा प्रतवारी यंत्रनिर्मिती; अकोला कृषी विद्यापीठाचा अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार


कांदा प्रतवारी यंत्रनिर्मिती; अकोला कृषी विद्यापीठाचा अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार

कृषिकिंग, अकोला: कांदा उत्पादनात राज्य आघाडीवर असून, कांदा प्रतवारी करणे कठीण होत असल्याने अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुधारित कांदा प्रतवारी यंत्राची निर्मिती केली असून, दोनच दिवसांपूर्वी विद्यापीठाने या यंत्राची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी एका अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे.

"कृषी विद्यापीठांतर्गत कापणी पश्चात अभियांत्रिकी संशोधन विभागाने विविध प्रक्रिया उपकरणे, यंत्र विकसित केली असून, नव्याने सुधारित मॉडेल निर्माण केले आहे. ही उपकरणे, यंत्र निर्मितीसाठी आतापर्यंत २५ खासगी यंत्र निर्मात्यासोबत कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. यातून १८ प्रकारची यंत्रे निर्माण होणार आहेत. असाच हा नवीन करार करण्यात आला असून, या कराराच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिली आहे.

तसेच कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, संगणक प्रणाली, स्वयंचलित कृषी प्रणालीचा उपयोग करून शेतीमध्ये दुसरी हरितक्रांती होऊ शकते, असेही डॉ. भाले यांनी यावेळी सांगितले आहे.टॅग्स