04 July 11:15

कांदा निर्यातीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


कांदा निर्यातीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याकडून प्रसारित करण्यात आलेल्या माहितीनुसार, सरकारने कांदा निर्यातीवरील मुदत तीन महिन्यांनी वाढवून ३० सप्टेंबर केली आहे. सरकारने हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कांद्याच्या किमतीत होत असलेली घसरण थांबवण्यासाठी घेतला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कांद्याच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते.