28 December 18:35

कांदा निर्यातीवरील अनुदान ५ टक्क्यांहून १० टक्क्यांवर: केंद्र सरकारचा निर्णय


कांदा निर्यातीवरील अनुदान ५ टक्क्यांहून १० टक्क्यांवर: केंद्र सरकारचा निर्णय

कृषिकिंग, नवी दिल्ली: कांदा निर्यातीवरील अनुदान ५ टक्क्यांवरुन १० टक्क्यांवर करण्यात आले आहे. कांद्याच्या उत्पादनात वाढ, व त्यानुषंगाने दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यापूर्वी कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २० डिसेंबर रोजी घेतला होता. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी हा निर्णय लागू असेल. हे अनुदान थेट बँक हस्तांतरणाद्धारे शेतक-यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. या योजनेसाठी एकूण १५० कोटींचा निधीही मंत्रिमंडळाने मंजूर करण्यात आला आहे.



टॅग्स