15 August 16:10

कांदा निर्यातीवर निर्बंध घालावेत- पासवान


कांदा निर्यातीवर निर्बंध घालावेत- पासवान

कृषिकिंग, नवी दिल्ली: ‘स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यात मूल्य कमीत कमी ४५० डॉलर प्रति टन करावे,’ अशी मागणी अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर मागील २१ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचले असून बाजारपेठांमध्ये कांदा २६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जात आहे.

“२०१६-१७ मध्ये कांद्याचे २१.५ दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी २०.९ दशलक्ष टन नोंदवले गेले होते. देशात सध्या कांद्याची कोणतीही कमतरता नसून, व्यापारी साठेबाजी करत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी,” असेही त्यांनी सांगितले आहे.टॅग्स