25 November 12:32

कांदा निर्यातमूल्य लागू होताच दरात २५० रुपयांची घसरण


कांदा निर्यातमूल्य लागू होताच दरात २५० रुपयांची घसरण

कृषिकिंग, लासलगाव: केंद्र सरकारने दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डाॅलर प्रतिटन करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात सुमारे २५० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. आता आज म्हणजेच शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्टी आल्याने सोमवारी देखील कांद्याला किती भाव मिळतो. याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु झाली असून, शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लासलगाव बाजार समितीत गुरुवारी लाल कांद्याला ३ हजार ४०० रुपये भाव मिळाला होता. याच दिवशी दुपारी केंद्र सरकारने कांद्याची भाववाढ पाहून निर्यात होणाऱ्या कांद्यावर ८५० डाॅलर प्रति टन निर्यात मूल्य लागू केले. याचाच परिणाम म्हणून शुक्रवारी लाल कांद्याच्या भावात २५० रुपयांनी घसरून होऊन कांद्याला सरासरी ३१५० रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल २५० रुपये नुकसान शेतकरी वर्गाला सोसावे लागले. तर आता इथून पुढे रोज घसरणीला सामोरे जावे लागते की काय? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.टॅग्स