19 March 11:25

कांदा निर्यात २० टक्क्यांनी घटली; दरात घसरणीची शक्यता


कांदा निर्यात २० टक्क्यांनी घटली; दरात घसरणीची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातील कांदा निर्यातीत घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कांद्याचे दरही मागील आठ महिन्याच्या निच्चांकी पातळीवर पोहचले आहे. निर्यातीत घट झाल्याचे समोर आल्यामुळे दरात अजूनच घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, “चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या पहिल्या ९ महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या काळात देशातील कांदा निर्यातीत जवळपास २० टक्क्यांनी घसरण आहे. एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या काळात देशातून एकूण १९.२२ लाख टन कांदा निर्यात झाली. जी मागील वर्षी २०१६-१७ मध्ये याच काळात २४ लाख टन इतकी नोंदवली गेली होती.”

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा. यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या निर्यात मूल्य पूर्णपणे हटवले होते. मात्र, त्यांनतरही कांद्याच्या दरात घसरण ही सुरूच आहे. कांदा सध्या ७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरला आहे.टॅग्स