02 January 11:04

कांदा निर्यात मूल्यातील वाढ टळली; ८५० डॉलर प्रति टन २० जानेवारीपर्यंत लागू


कांदा निर्यात मूल्यातील वाढ टळली; ८५० डॉलर प्रति टन २० जानेवारीपर्यंत लागू

कृषिकिंग, नवी दिल्ली: "कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य (एमईपी) ८५० डॉलर (५५,२५० रुपये) प्रति टन लागू करण्याच्या निर्णयाला २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे." असे केंद्र सरकारच्या विदेशी व्यापार महासंचालनालयाकडून (डीजीएफटी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याचा वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी कांद्यावर प्रति टन ८५० डॉलर इतके निर्यात मूल्य लागू करण्याच्या निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. त्यावेळी निर्धारित करण्यात आलेले प्रतिटन ८५० डॉलर हे निर्यात मूल्य ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत लागू करण्यात आले होते. ज्याला आता २० जानेवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.टॅग्स