22 January 10:31

कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात


कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात केली आहे. आता कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य ७०० डॉलर (४५ हजार ५०० रुपये) प्रति टन असणार आहे. याआधी ते ८५० डॉलर (५५ हजार २५० रुपये) प्रति टन इतके होते. निर्धारित करण्यात आलेले हे निर्यात मूल्य २० फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने दर प्रचंड वाढले होते. त्यामुळे देशातून निर्यात होणारा कांदा थांबवून दर नियंत्रित करण्यासाठी सरकारने २३ नोव्हेंबर रोजी कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात ८५० डॉलर प्रति टनपर्यंत वाढ केली होती. ही वाढ सरकारकडून ३० डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आली होती. त्यानंतर त्यास सरकारने २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. आणि आता सरकारकडून कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात करण्यात आली असून ती ७०० डॉलर प्रति टन निर्धारित करण्यात आली आहे.टॅग्स