08 September 10:55

कांदा दरातील घसरणीमुळे ‘एमईपी’ प्रस्तावाला सरकारचा नकार


कांदा दरातील घसरणीमुळे ‘एमईपी’ प्रस्तावाला सरकारचा नकार

कृषिकिंग, नवी दिल्ली: कांद्याचे दर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालायाकडे कांद्याचे किमान निर्यात मूल्य (एमईपी) निश्चित करण्याची मागणी केली होती.

परंतु, मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट झाली असून, कांदा १५ ते १६ रुपये प्रति किलो दराने घसरण झाली आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारातून कांद्याची आयात करण्यात आल्यामुळे देशांतर्गत बाजारावर आयातीचा प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे सरकारने आता अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या किमान निर्यात मूल्य निश्चितीच्या या मागणीला नकार दिला आहे.टॅग्स