04 January 08:30

कांदा उत्पादनात ४.५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता- कृषी मंत्रालय


कांदा उत्पादनात ४.५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता- कृषी मंत्रालय

कृषिकिंग, नवी दिल्ली: चालू पीक वर्षात (जुलै २०१७-जून २०१८) कांदा उत्पादनात ४.५ टक्क्यांनी घट होऊन, ते २१.४ दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २२.४ दशलक्ष टन कांदा उत्पादन नोंदवले गेले होते. अशी माहिती कृषी मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

तसेच कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, “यावर्षी कांदा लागवडतही घसरण झाली आहे. यावर्षी १.१९ दशलक्ष हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी १.३० दशलक्ष हेक्टरवर नोंदवली गेली होती.”टॅग्स