12 December 12:49

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान द्या- रावते


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान द्या- रावते

कृषिकिंग, मुंबई: "राज्यातील उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान देण्यात यावे. तसेच मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी, कांदा निर्यातीस प्रोत्साहन अनुदान द्यावे," अशी मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसून, याप्रश्नी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारने यापूर्वी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ८०० रुपये प्रति क्विंटल भाव निश्‍चित करून हा भाव व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेला भाव यातील फरकाची रक्कम भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली होती. त्याच धर्तीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करावी. सध्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण ३५१ रुपये प्रति क्विंटल दराने उन्हाळी कांदा विक्री करावा लागत आहे. हा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. असेही ते म्हणाले आहे.टॅग्स