20 December 14:15

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

कृषिकिंग, मुंबई: " राज्यातील कांदा उत्पादकांसाठी राज्य सरकारने १५० कोटी रुपयांची तरतूद केली असून, प्रति क्विंटल २०० रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतली असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आज (गुरुवारी) घेतला आहे.

कांदा उत्पादकांसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यानुसार कमी किंमतीमध्ये कांदा विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना २०० रुपये प्रति क्विंटल इतके अनुदान दिले जाणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान एकूण ७५ लाख टन तर प्रति शेतकरी २०० टन कांद्यासाठी देण्यात येणार आहे. यामध्ये १८ नोव्हेंबरपर्यंतच्या ४१.२३ लाख टन आणि २५ डिसेंबर पर्यंतच्या ३३.७३ लाख टन कांद्याचा समावेश आहे.टॅग्स