02 January 10:25

कांदयाला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार- सुभाष देशमुख


कांदयाला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार- सुभाष देशमुख

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात सुभाष देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. कांद्यासाठी सरकारने अनुदान जाहीर केले आहे. काही बाजार समित्या शेतमालाचे दर उतरावेत म्हणून बाजार समित्या बंद ठेवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी असे प्रकार होत असतील तर त्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या खळ्यावर नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च घेऊ नये, असेही देशमुख यावेळी म्हणाले आहे.



टॅग्स