20 December 14:32

कांदयाच्या २०० रुपये अनुदानाने मी समाधानी नाही- राज ठाकरे


कांदयाच्या २०० रुपये अनुदानाने मी समाधानी नाही- राज ठाकरे

कृषिकिंग, पेठ(नाशिक): " राज्यातील कांदा उत्पादकांसाठी राज्य सरकारकडून प्रति क्विंटल २०० रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून जाहीर करण्यात आलेले २०० रुपयांचे अनुदान हे पुरेसे नाही." अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे सभेत बोलत होते.

दरम्यान, सरकारला निवेदनाची भाषा समजत नाही. त्यामुळे कांदा फेकून मारा. असा सल्ला आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. सरकार दिलासा देत नसेल तर कांदा रस्त्यावर फेकू नका तो दिसेल त्या मंत्र्याला फेकून मारा. त्याच कांद्यानं शुद्धीवर आणा आणि परत मारा. असेही राज ठाकरे म्हणाले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून आहे. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा समजून घेत आहे. काल दिंडोरी, कळवण या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांदा चाळींना भेट देत उन्हाळ कांद्याच्या झालेल्या नुकसानीचाही त्यांनी आढावा घेतला.टॅग्स