25 September 10:23

कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण! –शरद पवार


कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण! –शरद पवार

कृषिकिंग, अहमदनगर: संपूर्ण कर्जमाफी जाहीर करूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला फटाकरले आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. त्याचे आम्ही स्वागत केले. परंतु, नंतर त्यांनी ‘संपूर्ण’ शब्द काढून टाकला. कर्जमाफीबाबत त्यांनी आतापर्यंत सहा वेगवेगळ्या घोषणा केल्या. आधी दीड लाख भरा, मग कर्जमाफी मिळेल, असा नवा आदेश त्यांनी काढला. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.टॅग्स