06 August 18:05

ओडिसा, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी


ओडिसा, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, नवी दिल्ली: येत्या २४ तासांत ओडिसा व उत्तराखंड या राज्यांमध्ये मुसळधार तर पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि झारखंड या राज्यांमधील काही भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

याशिवाय येत्या २४ तासांमध्ये पूर्व मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, कोकण आणि गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाबच्या काही भागांमध्ये, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, पूर्वेकडील राज्य, विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. असा अंदाजही आयएमडीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

तर उत्तरप्रदेश बिहारसह अनेक राज्यांमध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसाने कहर केला आहे. सतत सुरू असेलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, या राज्यांमधील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळ पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड या राज्यांच्या अनेक भागांमध्ये मुसळधार; पश्चिमी उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, बिहार आणि उत्तरी ओडिसाच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार, तर हरियाणा, उत्तरी पंजाब, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, पूर्व मध्यप्रदेश, केरळ, कोकण आणि गोवा तसेच अंदमान-निकोबार येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला आहे.

दरम्यान हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनच्या चालू हंगामात १ जून ते ५ ऑगस्ट याकाळात संपूर्ण देशभरात १० टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे.टॅग्स