21 December 11:44

ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत घोषित


ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत घोषित

कृषिकिंग, नागपूर: "ओखी वादळामुळे राज्यातील नुकसान झालेल्या कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये तर बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्यात येईल." अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. घोषित केलेली नुकसान भरपाईची ही मदत राज्य शासनाच्या निधीतून तात्काळ देण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले आहे.

“ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकाचे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ ७ डिसेंबर रोजी देण्यात आले आहेत. पंचनामे योग्यरित्या व्हावेत यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्यांबाबत कोठे काही तक्रारी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या जातील.” असेही ते म्हणाले आहे.