05 October 07:00

ऊस सल्ला: पूर्वहंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबर पर्यंत करावी


ऊस सल्ला: पूर्वहंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबर पर्यंत करावी

१२ ते १६ आठवडे वयाच्या आडसाली उसाच्या को. ८६०३२ या जातीसाठी नत्राची तिसरी मात्रा ५० किलो देण्यासाठी १०९ किलो युरिया प्रति हेक्टरी वापरावा इतर जातीच्या उसाकरिता ४० किलो नत्र देण्यासाठी ८७ किलो युरियाचा वापर करावा.
पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करावी यासाठी को. ९४०१२, को. ८६०३२, को.एम. ०२६५ या जातींची निवड करावी. लागणीपूर्वी बेण्यास ३०० मिली मॅलेथियॉन अथवा २६५ मिली डायमेथोएट व १०० ग्रॅम बाविस्टीन १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे १० मिनिटे बुडवून बेणे प्रक्रिया करावी.
डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगावटॅग्स