27 December 07:00

ऊस सल्ला: पाणी व्यवस्थापन आणि लोकरी मावा नियंत्रणासाठी मित्र किडींचा वापर


ऊस सल्ला: पाणी व्यवस्थापन आणि लोकरी मावा नियंत्रणासाठी मित्र किडींचा वापर

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८
१. ठिबक सिंचन संचातून पाणी देताना त्या त्या विभागातील हवामान विचारता घेऊन दररोजची पाण्याची गरज काढण्यासाठी ‘फुले जल’ संगणक प्रणालीचा वापर करावा. उस पिकासाठी ७५ ते १०० सेमी (२.५ ते ५ फुट) जोडओळ (मध्यम जमिनीसाठी ९० ते १८० सेमी), ३ ते ६ फुट जोडओळ (भारी जमिनीसाठी) व ५ फुटी लागवड पद्धतीचा वापर करावा.
२. ठिबक सिंचन संचातून उसासाठी पाण्याबरोबर विद्राव्य खतांच्या शिफारशीत मात्रेचा वापर करावा.
३. उसावरील लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोब्राथा, मायक्रोमस, डीफा हे मित्र कीटक माव्यासोबत असतील तर शक्यतो कीटकनाशक वापरू नये. मित्र कीटकांची उपलब्धता नसल्यास फोरेट १० % दाणेदार एकरी ६ ते ८ किलो या प्रमाणात ९ महिन्यापर्यंतच्या उसासाठी वापरावे किंवा डायमिथोएट ३०% प्रवाही किंवा मिथिल डिमॅटॉन २५ % प्रवाही १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार आलटून पालटून फवारणी करावी.
४. उसाची तोडणी हंगामनिहाय व पक्वता पाहून करावी. तोडणीपुर्वी १५ दिवस पिकाचे पाणी बंद करावे. तोडलेला उस ताबडतोप गळीतास पाठवावा. सुरु १२ ते १३ महिने, पूर्व हंगामी १४ ते १५ महिने आणि आडसाली १६ ते १८ महिण्यात उस तोडणी करावी.

डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82