10 September 07:00

ऊस सल्ला: आडसाली उसात नांगे भरा व पूर्वहंगामी उसाची तयारी करा


ऊस सल्ला: आडसाली उसात नांगे भरा व पूर्वहंगामी उसाची तयारी करा

आडसाली उसाची लागण केलेल्या क्षेत्रात उगवण विरळ झालेल्या ठिकाणी रोप लागण पद्धतीने वेळीच नांग्या भरून घ्याव्यात. पूर्वहंगामी ऊस लागणी करीता पूर्व मशागतीची कामे पूर्ण करा. मशागत केलेल्या क्षेत्रात हेक्टरी 25 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. यापैकी अर्धे शेणखत (12.5 टन) दुसऱ्या नांगरटीपूर्वी व अर्धे शेणखत (12.5 टन) लागणीपूर्वी सरी सोडण्यापूर्वी द्यावे.
डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगाव