03 December 07:00

ऊस सल्ला: आडसाली आणि पूर्वहंगामी उस भाग १


ऊस सल्ला: आडसाली आणि पूर्वहंगामी उस भाग १

स्त्रोत: कृषिकिंग डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८ १. आडसाली उसाची मोठी बांधणीची कामे पूर्ण करावीत. बांधणीचे वेळी १६० किलो नात्र (३४७ किलो युरिया), ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ८५ किलो पालाश (१४१ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. को ८६०३२ जातीसाठी प्रती हेक्टरी २०० किलो नत्र (४३४ किलो युरिया) १०० किलो स्फुरद (६२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व १०० किलो पालाश (१६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावा. २. पूर्वहंगामी उसाचे पिक १२ ते १६ आठवड्याचे असताना ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया) ६:१ याप्रमाणे निंबोळी पेंडीबरोबर मिसळून द्यावे.
डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगाव