07 March 07:00

ऊस सल्ला: असे करा पूर्वहंगामी ऊसाचे खत नियोजन


ऊस सल्ला: असे करा पूर्वहंगामी ऊसाचे खत नियोजन

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८

• १६ आठवडे वयाच्या लागणीस शिफारशीत खतमात्रेच्या १० टक्के नत्र (७४ किलो युरिया), ६ भाग युरियास एक भाग निंबोळी पेंड याप्रमाणे चोळून नत्र खताचा तिसरा हप्ता द्यावा.
• पक्क्या भरणीयोग्य वाढलेल्या २० आठवडे वयाच्या उसात आंतरपिके घेतली असल्यास त्यांची परिस्थिती पाहून काढणी करा अथवा सरीतच दाबून भरणीची तयारी करा. यावेळी नांगराच्या सहाय्याने सरीचे वरंबे फोडून बाकी राहिलेली रासायनिक खतांची मात्रा ४० टक्के (३१० किलो युरिया), ५० टक्के स्फुरद व पालाश (५३० किलो सुपर फॉस्फेट आणि १५५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) यांची भरणी करून पाणी द्यावे.
• आवश्यकतेनुसार जमिनीचा मगदूर व ओलावा पाहून ८-१० दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा करावा.
• ठिबक सिंचनाची सोय असल्यास १०-२० आठवड्यापर्यंत उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रती हेक्टरी ९ किलो नत्र, ५ किलो स्फुरद व ३ किलो पालाश हि अन्नद्रव्ये ७ दिवसाच्या अंतराने अकरा समान हप्त्यात विभागून ठिबकमधून द्यावीत.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/adverties_product.php