18 August 07:00

ऊस सल्ला : खतमात्रा व तणनियंत्रण


ऊस सल्ला : खतमात्रा व तणनियंत्रण

आडसाली उसाला लागवडीचे वेळी शिफारशीतील मात्रेच्या 10 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद, 50 टक्के पालाशयुक्त खताची मात्रा घ्यावी. उसासाठी नत्रयुक्त खतांसाठी निमकोटेड युरीयाचा वापर करावा. उसाला खते देताना को. 86032 या जातीची हेक्टरी 500:200: 200 किलो नत्र, स्फुरद व पालाश ही खतमात्रा घ्यावी तर को. एम. 0265 व को.व्ही.एस.आय. 9805 या जातींसाठी हेक्टरी 400:170:170 किलो नत्र, स्फुरद व पालाश खत मात्रेचा वापर करावा.
आडसाली उसाची लागण केल्यानंतर जमिनीत वापसा आल्यानंतर (साधारण 3-4 दिवसांनी) उसातील तणांच्या बंदोबस्तासाठी एकरी 2 किलो अॅट्रॅझीन (अॅट्रॅटॉप) किंवा 600 ग्रॅम मेट्रीब्युझीन (सेंकॉर) 400 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण क्षेत्रावर फवारणी करावी.
डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगावटॅग्स