12 October 14:51

उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढ


उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढ

कृषिकिंग, नाशिक: उन्हाळ कांद्याची साठवणूक क्षमता संपली असून, कांद्याला आता कोंब येत आहेत. याशिवाय दक्षिण भारतातही कांदा आवक कमी असून, तेथून जो कांदा येत आहे तोही खराब प्रतीचाच असल्याने नाशिकच्या कांद्याच्या मागणी वाढ झाली आहे. परिणामस्वरूप, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. कांद्याला सध्या किमान १२०० ते तर कमाल १,४५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

राज्यासह कांदा उत्पादक प्रदेशात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, अनेक तालुक्यांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे पीकांना पाणी कुठून द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लाल कांदा देखील बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्गामध्ये होती. मात्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणामध्ये पावसामुळे कांदा खराब झाला असल्याने बाजारात आवक मंदावली आहे. त्यामुळे येत्या काळातही उन्हाळ कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असणार आहे.टॅग्स