25 May 14:24

उन्हाळ कांद्याच्या निर्यात अनुदानात वाढ; ३ टक्क्यांवरून ५ टक्के


उन्हाळ कांद्याच्या निर्यात अनुदानात वाढ; ३ टक्क्यांवरून ५ टक्के

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात अनुदानात वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे निर्यातदारांना आता आपल्या मालावर टक्क्यांनी ऐवजी ५ टक्के निर्यात अनुदान मिळणार आहे. अशी माहिती केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महामंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेतून देण्यात आली आहे.

या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, “सध्यास्थितीत उत्पादित होत असलेल्या उन्हाळ कांद्यावरील निर्यात अनुदान ३ टक्क्यांवरून वाढवत ५ टक्के करण्यात आले आहे.” सरकार या अनुदान योजनेअंतर्गत उत्पादन आणि देशातील कांद्याच्या उपलब्धतेच्या आधारावर अनुदान देत असते. हे अनुदान जहाजावर माल पाठवण्याच्या शुल्काच्या टक्केवारीच्या आधारावर दिले जाते.टॅग्स