12 September 16:30

उन्हाळ कांदा सडला; एक रुपया खर्चून २५ पैसे कमाई!


उन्हाळ कांदा सडला; एक रुपया खर्चून २५ पैसे कमाई!

कृषिकिंग, नाशिक: वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवला. मात्र, आता तोच कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. कधी उत्पादन जास्त तर भाव कमी, तर कधी उत्पादन कमी तर भाव जास्त. सरकारचे धरसोड धोरण, बाजार पेठेतील असुरक्षित वातावरण, कोणत्याही अधिक उत्पादित मालाच्या निर्यातीच्या ठोस योजना नाही की भावाबाबत ठोस आश्वासन नसल्याने बऱ्याच वेळा शेतीमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांच्या नशिबी येते. अर्थात "एक रुपया खर्चून पंचविस पैसे कमवायचे." अशी परीस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे.

आँगस्ट महिन्यात सुरू असलेल्या रिमझिम पाऊस व गारव्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडला आहे. सुरवातीला पोळ कांद्याला भाव असल्याने झालेल्या चार पैशातून मोठ्या प्रमाणात खर्च शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्यावर केला. साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून उन्हाळ कांद्याची रोपे टाकण्याची लगबग सुरु होते. म्हणजे रोपे टाकण्यापासुन एक वर्षाचा कालावधी उन्हाळ कांद्याला झालेला आहे. ऊन, बेमोसमी पाऊस, गारा, खराब हवामान या संकटातून उन्हाळ कांद्याचे पिक वाचवुन साठवलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. आज मिळणा-या भावातून शेतकऱ्यांचा खर्चही वसुल होत नसल्याने पर्यायाने मिळेल त्या भावात कांदा विक्री करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून कांदयांस किमान २ हजार रूपये हमीभाव द्यावा व शेतक-यांना आधार द्यावा. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.



टॅग्स