15 March 12:16

उत्तरेकडील राज्यांत बर्फवृष्टीसह जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी


उत्तरेकडील राज्यांत बर्फवृष्टीसह जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, नवी दिल्ली: पाकिस्तानच्या उत्तरेकडे एक पश्चिमी कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत उत्तर भारतीय डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मैदानी राज्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, आसाम, झारखंड आणि ओडिसाच्या उत्तरी भागात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाचा उत्तर भारतातील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मात्र, अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, आयएमडीच्या स्थानिक शाखेने कालच महाराष्ट्रातील मराठवाडा-विदर्भांत १६ आणि १७ मार्च पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.टॅग्स