10 July 16:35

उत्तर भारतात पुढील ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता


उत्तर भारतात पुढील ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बिहार आणि उत्तराखंडसहित उत्तरेकडील राज्यांत पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या दोन्ही राज्यांतील नद्या पुरामुळे सध्या दुथड्या भरून वाहत आहे. तसेच दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशच्या पश्चिमी भागात पुढील दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांतील काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच पुढील २४ तासांत पश्चिम बंगाल, मेघालय, मणिपूर, मिझोराम, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत चांगला पाऊस होईल. तर छत्तीसगढ, पश्चिम उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथे मॉन्सून सक्रिय राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

देशभरात ८ जुलैपर्यंत २३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिलीगुडी येथे गेल्या २४ तासांत १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर गोरखपूर (उत्तरप्रदेश) १५९ मिमी आणि कूच (बिहार) १५६ मिमी एवढ्या मोठ्या प्रमाणात पडला.टॅग्स