07 June 11:27

आयएमडीच्या अंदाजानुसार देशभरात ९८ टक्के पाऊस


आयएमडीच्या अंदाजानुसार देशभरात ९८ टक्के पाऊस

कृषिकिंग,पुणे : आयएमडीने या वर्षी मॉन्सूनच्या पावसात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहे. आयएमडीने मंगळवारी आपला यावर्षीच्या जाहीर केलेल्या दुसऱ्या अंदाजानुसार देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार आहे. यापूर्वी पहिल्या अंदाजानुसार आयएमडीने जवळपास ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच आता नवीन अंदाजानुसार देशाच्या सर्वच भागांत चांगले पाऊसमान राहणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या काळात मध्य भारतात १०० टक्के पाऊस होऊ शकतो. तसेच दक्षिण भारतात या काळात ९९ टक्के तर उत्तर भारतात ९६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात देशभरात ९६ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९९ टक्के पावसाचा अंदाज आहे.